सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्ज पेडलर रिगल महाकालला अटक

मुंबईतील लोखंडवाला, ओशिवारात एनसीबीची छापेमारी, या व्यक्तीकडून ड्रग्ज आणि रोकड जप्त

0

मुंबई : मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने अधिक तपास करण्यास सुरुवात केली. यात अनेक सेलिब्रिटींची चौकशीही करण्यात आली असून काहींवर अटकेची कारवाईही केली होती. अशातच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या संपर्कातीव रिगल महाकाल नावाच्या  व्यक्तीस एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील लोखंडवाला, ओशिवारा परिसरात एनसीबीने छापेमारी करून ही कारवाई केली. छापेमारीत एनसीबीने मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आणि रोकडही जप्त केली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. अटक करण्यात आलेला महाकाल हा अनुज केशवानी म्हणजे, जो रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवत होता. एनसीबी मिल्लत नगर, लोखंडवालामधील एका घरात छापेमारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर करण्यात आला होता. शौविक चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवणारा पेडलर अनुज केशवानी हा रिगल महाकालकडून ड्रग्स घेत होता. त्यानंतर अनुज केशवानी त्या ड्रग्ज पुढे सप्लाय करत होता, अशी माहिती एनसीबीच्या वतीने देण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.