‘एनसीबी’ अधिकारी समीर वानखेडेंच्या पथकावर हल्ला, पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणते…

गोरेगाव परिसरातrn ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या 'एनसीबी'च्या पथकावर जमावाचा हल्ला

0

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास करणाऱ्या एनसीबी पथकावर काल मुंबईत हल्ला झाला होता. या पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे  यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास करणाऱ्या एनसीबी पथकावर काल मुंबईत हल्ला झाला होता. या पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे  यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली. समीर व्यवस्थित असल्याचे सांगत क्रांतीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतील सर्व अधिकाऱ्यांना सलाम केला. “शुभेच्छा आणि काळजीसाठी तुम्हा सर्वांचे आभार. समीर वानखेडे ठीक आहेत. आम्ही सर्व कुटुंबीय त्यांच्यासोबत कणखरपणे पाठिशी उभे आहोत. खंबीरपणे राहून लढा देणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतील सर्व अधिकाऱ्यांना सलाम. तुम्ही आमची मान आज आणि नेहमीच अभिमानाने उंचावता,” अशा भावना क्रांतीने व्यक्त केल्या आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.