आज दुपारी 12 वाजता धार्मिक विधीने नवरात्राची सांगता

सोमवारी पहाटे तुळजाभवानी मातेचे होणार सीमोल्लंघन

0

तुळजापूर : नवरात्रीची रविवारी दुपारी होमावरील धार्मिक विधीने  सांगता झाली. दुर्गाष्टमीनिमित्त शनिवारी (दि. २४) तुळजाभवानी देवीची उन्मत्त महिषासुराचा वध करतानाची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडली. तत्पूर्वी सकाळी वैदिक मंत्रोच्चारात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सपत्नीक होमकुंडात कोहळ्याची पूर्णाहुती दिली. दरम्यान, रविवारी दुपारी होमावरील धार्मिक विधीने नवरात्रीची सांगता झाली, तर सोमवारी (दि. २६) पहाटे उषःकाली तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा होणार आहे.

सकाळच्या वैदिक पूजेवेळी शासकीय उपाध्ये बंडू पाठक, राजन पाठक, सुनील लसणे, शरद कांबळे, श्रीराम अपसिंगेकर, मकरंद प्रयाग आदी ब्रह्मवृंदाने वैदिक मंत्रोच्चारात ग्रंथपूजन, सप्तशती, पुण्याहवाचन, अग्नि स्थापना हवन आदी विधी पार पाडले. सकाळची अभिषेक पूजा संपल्यानंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धूपारती नंतर पुजारी अतुल मलबा यांनी अंगारा काढला. या वेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा यांच्यासह पलंगे, छत्रे, चोपदार आदी सेवेकरी उपस्थित होते. त्यानंतर सुधीर कदम, अमर परमेश्वर, दिनेश परमेश्वर, संजय सोंजी आदींनी तुळजाभवानी मातेची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा मांडली. या वेळी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. पहाटे चरण तीर्थ पूजा होऊन मंदिर उघडण्यात आले, तर सकाळी ६ वाजता अभिषेक पूजा घालण्यात आली. सायंकाळी छबिना मिरवणूक काढण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.