नवी मुंबईतील विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूहल्ला, बुलडाण्यात तिघांना अटक

गळा चिरुन त्याच्या मोबाईलसह आठ हजार रुपये घेऊनहे तिघे फरार

0

बुलडाणा : मुंबईला खरेदीसाठी गेलेल्या तीन युवकांजवळील पैसे संपल्याने त्यांनी एका विक्रीकर अधिकाऱ्याला लक्ष्य केले होते. या युवकांनी विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करून त्याचा गळा चिरुन त्यांच्या मोबाईलसह 8 हजार रुपये घेऊन हे तिघे पसार झाले. अखेर त्यांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.

बुलडाण्यातील तीन तरुण मुंबईला खरेदीसाठी मुंबईला गेले होते. त्यांच्याजवळील पैसे संपल्याने  त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास नवी मुंबईतील सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रॅकजवळून पायी जाणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूहल्ला केला. महेश मधुकर बिनवडे असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकूने वार करुन या तिघांनी त्यांना जखमी केले. यानंतर त्यांच्या जवळील स्मार्टफोनसह 8 हजार रुपये घेऊन हे चोरटे फरार झाले. या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चिरला गेल्याने ते गंभीर जखमी झाले, सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी बिनवडे यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केल्यानंतर तो मोबाईल मुंबईत सापडला. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे उघडकीस आले. बुलडाण्यातील अमित सुनील बेंडवाल, आबिद खान अयुब खान उर्फ कालू, अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या या तिघांची माहिती बुलडाणा पोलिसांना मिळाल्यावर शहर डीबी पथकाने बुलडाण्यातील आरोपी तिघांना ताब्यात घेतले. या दरोड्यात मुंबईतील अन्य 2 आरोपींचा समावेश असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांनी दिली असून आरोपी अमित बेंडवाल याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.