नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी…, विरोधकांवर टीकेसाठी नाही!

एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत जाहीररित्या प्रवेश करणार, रावसाहेब दानवेंनी राष्ट्रवादीला दिला सल्ला

0

औरंगाबाद : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसेंचा उपयोग हा राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीका करण्यासाठी करू नये, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. गेल्या चार दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत जाहीररित्या प्रवेश करणार आहेत. यावरुन रावसाहेब दानवेंनी राष्ट्रवादीला सल्ले दिले.

“नाथाभाऊ जर तिथे गेले तर त्यांचा उपयोग अशा कामासाठी न करता, ते ज्येष्ठ आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांचा उपयोग या राज्याच्या भल्यासाठी करावा. नाथाभाऊंचा उपयोग विरोधकांवर तोफ डागण्यासाठी करु  नये. त्यांचा उपयोग भल्यासाठी करुन घ्यावा,” असे रावसाहेब दानवे म्हणाले. “कोणाच्या रोखल्याने कोणी रोखले जात नसते. 2019 च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, असे वाटते. भाजपलाही अशापद्धतीने काही मोठे नेते फोडून नुकसान पोहोचवता येते का, असा त्यांचा प्रयोग सुरू आहे. ते आता सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आमच्या नेत्यांवर, विरोधी पक्षनेत्यांवर किंवा पक्षातील अध्यक्षावर काही परिणाम होईल, असे काही नाही,” असेही दानवे म्हणाले. “आमच्या सरकारमध्ये पारदर्शक काम झाली आहेत. कोणी कितीही आरोप केला तरी त्याचा परिणाम आमच्यावर होत नाही. आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता नाही. पण नाथाभाऊ गेल्याचे दु:ख आहे,” असेही रावसाहेब दानवेंनी सांगितले. “ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले. त्याच पक्षात जाण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. त्यांनी जाऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले,” असेही दानवे यावेळी म्हणाले. “नाथाभाऊ माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला जातो. त्यांच्या शेतात, फार्महाऊसवरही जातो. ते पंढरपूरला आल्यावर माझ्या घरी येतात. आम्ही अगदी घरगुती संबंध आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.