कोणी पद देणार म्हणून नाथाभाऊ पक्षप्रवेश करत नाही : एकनाथ खडसे

माझ्या मतदारसंघातील विकासकामांना वेग, याकरिता मला पाहिजे सरकारची साथ

0

मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी “कोणी काही पद देणार म्हणून नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही,” असा खोचक टोला  भाजपला लगावला. “माझ्या मतदारसंघातील विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी,” असेही एकनाथ खडसे म्हणाले.

गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होणार आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.