आगामी लोकसभा निवडणूकीनंतर मोदी पंतप्रधान होणार नाहीत, शरद पवारांचे भाकीत

0

आगामी लोकसभा निवडणूकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘या निवडणूकीत भाजप सर्वात मोठा पक्ष बनेल परंतु बहुमताचा आकडा ते पार करू शकणार नाहीत. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी त्यांना आघाडी करावी लागणार आहे. त्यामुळे मोदींना इतर पक्ष स्वीकारणार नाहीत. म्हणून मोदी पुढील पंतप्रधान राहणार नाही, असे वाटते.’ असे भाकीत पवार यांची वर्तवले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले ‘एअर स्ट्राईकमध्ये आम्हाला राजकारण आणायचे नाही. परंतु ज्या लोकांना निवडून येण्याची शक्यता वाटत नाही तेच राजकारण करत आहेत.’

मी माझ्या 52 वर्षांच्या कारकिर्दीत 14 निवडणूका जिकलो. मी माढाचा निर्णय दिल्यानंतर काही लोकांनी बालिशपणाचे वक्तव्य केले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हेही कधीतरी निवडणूकीत हरले आहेत. पण मी कधीच हरलो नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी माझ्याबाबत वक्तव्य करताना विचार करायला हवा, असा टोमणा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.