‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे, पाहा प्रोमो
‘कोण होणार करोडपती’ या मराठी शोचे नवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. या मराठीच्या नवीन पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार याची प्रतिक्षा सर्वांनाच होती. अखेर या शोच्या सूत्रसंचालनाचा चेहरा समोर आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. नागराज मंजुळे यांनी आपल्या फेसबुक पेजवर या शोचा प्रोमो शेअर केला आहे.
हे या शोचे तिसरे सिझन असून पहिले सिझन सचिन खेडेकर यांनी तर दुसरे सिझन स्वप्निल जोशीने केले होते. आता नागराज मंजुळे या शोची धूरा कशी संभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रोमो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
कोण होणार करोडपती..!?@sonymarathitv pic.twitter.com/2aFJvLJVTo
— nagraj manjule (@Nagrajmanjule) March 2, 2019