निलंगा येथे AIN न्यूज़ने बातमी करताच नगरपालिकेने अवैद्य बांधकाम करणाऱ्यांना दिली नोटिसा

0

लातूर : जिल्ह्यातल्या निलंगा शहरात अनधिकृतपणे मोकळ्या जागा हडपण्याचा आणि अनधिकृत अतिक्रमण आणि बांधकामं करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत ! निलंगा शहरातल्या जिल्हा परिषद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत सुरु असलेल्या अनधिकृत अतिक्रमण आणि बांधकामांविरोधात शहरातल्या नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केलं ! अनेक निवेदने , पत्र देऊनही  नगरपालिकेला जाग आली नाही, मात्र AIN न्यूज़ ची टीम उपोषणकर्त्यांची बातमी करण्यासाठी पोहचताच नगरपालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि कांही वेळातच अनधिकृत अतिक्रमण व बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ बांधकाम थांबविण्याचे व केलेले बांधकाम पडण्याची नोटीस देण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.