संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली, वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास

0

पुणे : प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज पहाटे (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ येथे सकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात येणार आहे.

 कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ येथे नरेंद्र भिडे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पश्चात आई , वडील , पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. सिव्हिल इंजिनीअरची पदवी घेतलेल्या नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटके, मालिका, मराठी चित्रपट  देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत.

नरेंद्र भिडे यांनी पेईंग घोस्ट, देऊळ बंद, बायोस्कोप, रानभूल, चि व चि सौ का, हम्पी, उबंटू, लाठे जोशी, पुष्पक विमान, 66 सदाशिव, मुळशी पॅटर्न यासारख्या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले. मुळशी पॅटर्न, देऊळ बंद, सरसेनापती हंबिरराव मोहिते, पुष्पक विमान या चित्रपटांतील गाणी संगीतबद्ध केली होती सरसेनापती हंबिरराव मोहिते हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही नरेंद्र भिडे यांच्यातील संगीतकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत त्यांनी अनेक चित्रपट गीतांना स्वरसाज चढवला. पुण्यातील डॉन स्टुडिओचे संगीत संयोजक आणि संचालक म्हणून ते कार्यरत होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.