आकांशा देशमुखच्या हत्येप्रकरणी एका मजूराला अटक, चोरीच्या हेतून केला खून

0

औरंगाबाद : शहरातील एमजीएममधील गंगा वसतीगृहात आकांशा देशमुख या तरुणीची हत्या झाली होती. या हत्येची मागील आठवड्यापासून चर्चा सुरु आहे. अखेर आकांशाच्या मारेक-याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एमजीएम परिसरात काम करत असलेल्या मुळच्या उत्तर प्रदेशातील राहूल शर्मा या मजूराने आकांशाची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशच्या दुधनी येथून अटक करून रात्री उशीरा शहरात आणले.

पोलिसांनी अटक केल्याने आरोपीने खूनाची कबूली दिली. शहरात आणल्यानंतर आरोपीला वसतीगृहात नेण्यात आले, त्याने कशाप्रकारे आकांशाचा खून केला हे सांगितले.

एमजीएम परिसरातील गंगा वसतीगृहातच्या बाजूलाच एका इमारतीचे काम सुरु आहे. याच वसतीगृहात आकांशा राहत होती. त्या ठिकाणी अनेक मजूर दिवस आणि रात्र काम करत होते. हत्या झाल्यानंतर या मजूरांवर पोलिसांना संशय आला, त्यांनी ठेकेदाराकडून मजूरांची संपूर्ण माहिती घेतली. तेव्हा एक मजूर हत्येच्या दिवशीपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या माहितीत समोर आले.
आरोपी राहूल शर्मा 10 डिसेंबरच्या रात्री वसतीगृहाच्या छतावर जाऊन लपला होता. त्यानंतर तो चोरीच्या उद्देशाने मध्यरात्री आकांशाच्या खोलीत घूसला. यावेळी आकांशाला जाग आली. याचवेळी दोघांमध्ये झटापट झाली. तिची गळ्यातील सोन्याची साखळी चोरून त्याने आकांशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आकांशाला मासिक पाळी असल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो रात्री 3 वाजता सीसीटीव्हीपासून लपत एमजीएम परिसरातून बाहेर पडला.

शहरातून बाहेर पडल्यानंतर आरोपी राहूल शर्मा गावी गेला. त्याने कुणी ओळखू नये म्हणून दाढी काढली, केस कापले. तो नेहमी बसने गावी जात होता. मात्र यावेळी को रेल्वेने गावी गेला. मात्र पोलिसांनी कामगारांची चौकशी सुरु केल्यानंतर आरोपी राहूल शर्माचे नाव समोर आले.

वसतीगृहातील छतावरील एक पत्रा तुटलेला होता. या तुटलेल्या पत्रामुळे पोलिसांनी संशय आला. कारण छतावर सीसीटीव्ही नाहीत आणि या तुटलेल्या पत्रामुळे एक व्यक्ती सहज खोलीत शिरू शकते, याचाही अंदाजा आला. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास फिरवला आणि कामगार आरोपी राहूल शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.