शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टींचा खून, दोन घटनांनी हादरले लोणावळा

राहुल शेट्टींच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार, मारल्या तीन गोळ्या

0

पुणे : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवसेना संस्थापक उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांचा निर्घृण खून करण्यात आला. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर जयचंद चौकातच ही धक्कादायक घटना घडली .

आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर जयचंद चौकातच ही धक्कादायक घटना घडली. राहुल शेट्टी यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या मारल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हालविण्यात आले. मात्र, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घेषित केलं. यावेळी परमार रुग्णालयाच्या बाहेर शेट्टी सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती. लोणावण्यात गेल्या 24 तासांत दोन हत्येच्या घटना घडल्या. त्या हत्येच्या घटनांमुळे संपूर्ण लोणावळा हादरले आहे. राहुल शेट्टीपूर्वी दसर्‍याच्या रात्री हनुमान टेकडी येथील गणेश नायडू या युवकाचा देखील धारदार शस्त्रांनी वार करुन खून झाल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांनी लोणावळा शहर हादरले आहे. मागील चार पाच दिवसांपूर्वीच लोणावळ्यात सुूरज आग्रवाल नामक युवकाला दोन गावठी पिस्टल, कोयता आणि चाकू या हत्यारांसह पकडले होता. एकामागोमाग एक घडलेल्या या घटनांनी लोणावळा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, राहुल शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.