पुण्यात युवासेना पदाधिकारी दीपक मारटकरचा खून
दीपक हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा
पुणे : पुण्यात शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्याचा खून करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. दीपक मारटकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याच्यावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला आहे.
दीपक हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा आहे. रात्री दीड वाजता घराबाहेर फिरण्यास आलेल्या दीपकवर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी हल्ला करून खून केला. याच्यावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला . यानंतर बुधवार पेठ परिसरात तणावाच वातावरण आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की वैयक्तिक दुश्मनीतून झाला ? याची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पण दीपकच्या जवळच्यांकडे पोलिस यासंदर्भात चौकशी करत आहेत.