जालन्यात मालमत्तेच्या वादातून महिलेची हत्या; दहा जण ताब्यात, एक फरार

शहरात मध्यरात्री घडला थरार, महिलेचा पती गंभीर जखमी

0

जालना :  शहरातील काजीपुरा भागात लोखंडी रॉड ,चाकू आणि काठीने मारहाण करुन महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. हिना सय्यद माजीद असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिचा पती सय्यद माजिद सय्यद कय्यूम हा गंभीर जखमी झाला आहे.

काजीपुरा भागात लोखंडी रॉड ,चाकू आणि काठीने मारहाण करुन महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात सय्यद माजिद (30, काझीपुरा, जालना) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची पत्नी हिना खान व तिचे नातेवाईक यांच्यात मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होता. यातूनच रविवारी मध्यरात्री संशयित आरोपी अरबाज खान जफर खान, शाहबाज जफर खान, शेख अजगर शेख अब्दूल वहाब, अकबर धूम अली शाह, इस्माईल शाह व अन्य सहा महिलांनी तक्रारदार सय्यद माजिद सय्यद कय्यूम यांच्या काझीपुरा येथील घरात घुसून त्यांना व त्यांची पत्नी हिना यांना लोखंडी रॉड, काठी व चाकूने वार करुन जबर मारहाण केली. यात हिना सय्यद माजिद (30,काझीपुरा, जालना) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती तक्रारदार सय्यद माजिद हे गंभीर जखमी झाले. यावेळी आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही फुटेजचा डिव्हीआर बॉक्स पळवून नेला. याप्रकरणी 11 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक रमेश रुपेकर व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर गुन्ह्याची माहिती घेऊन 11 पैकी 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. अन्य एका आरोपीलाही लवकरच ताब्यात घेऊ, असे पीआय देशमुख यांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मृत महिलेचे हे दुसरे लग्न होते. तर पहिल्या पतीच्या नातेवाईकांसोबत त्यांचा मालमत्तेचा वाद होता. त्यातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.