तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीची हत्या, तीन संशयित ताब्यात

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अनुज बघेल

0

नागपूर : नागपुरात तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. अनुज बघेल असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो 16 मे रोजी तुरुंगातून सुटला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात नागपुरात गुन्हेगारी कमी झाली होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता मिळताच गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. नागपुरात काल रात्री तुरुंगातून सुटलेल्या अनुज बघेल या व्यक्तीची हत्या झाली. अनुज बघेलने तुरुंगात जाण्यापूर्वी एका व्यक्तीची गाडी जाळली होती. ही व्यक्ती त्याचा मोबदला मागत होती. मात्र, अनुज बघेल ने तो मोबदला देण्यास नकार दिला. या मुद्यावरुन दोघांमध्ये मोठे भांडण झाले. हे भांडण इतक्या टोकाला गेले की त्या त्यातून अनुज बघेलची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांत चार ते पाच हत्येच्या घटना घडल्या. त्यामुळे नागपुरात गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.