महापालिका निवडणुका : जागा वाटपात अडचण आल्यास निकालानंतर एकत्र येऊ – भुजबळ

जागावाटपात अडचणी आल्यास स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पर्याय खुला

0

नाशिक : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने जागावाटप होईपर्यंत आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष आपल्या पक्षाचा संघटनात्मक विस्तार करीत राहील. भारतीय जनता पक्षासह विविध पक्षांत नाराज आहेत. परंतु त्यांना प्रवेश देताना वरिष्ठ पातळीवर निर्णयानंतर त्यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. जागावाटपात अडचणी आल्यास स्वतंत्र निवडणूक लढता येईल. निवडणूक निकालानंतर देखील एकत्र येण्याचा पर्याय असेल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत जागावाटपात अडचणी आल्यास काय भूमिका असेल, या संदर्भात ते म्हणाले, जागावाटपात अडचण आल्यास त्यात देखील पक्षाचे वरिष्ठ नेते परस्परांत चर्चा करतील. एकमत न झाल्यास स्वतंत्र निवडणुका लढता येतील. निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर तिन्ही पक्षांकडे एकत्र येण्याचा पर्याय उपल्ब्ध आहे. भारतीय जनता पक्षासह विविध पक्षांतील नाराजांची मोठी संख्या आहे. त्यांना प्रवेश देण्याचे सूत्र असेल. वरिष्ठ त्याविषयी चर्चा करून निर्णय घेतील. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षामध्ये थेट लढत पाहायला मिळाली. अर्थात तीन पक्षांच्या एकजुटीमुळे भारतीय जनता पक्षाचा टिकाव लागला नाही. सहा पैकी चार जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाच्या पदरी फक्त एक जागा पडली. या निकालांनी भारतीय जनता पक्षाला जबर हादरा बसला असताना आता ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर पालिका निवडणुकांत पुन्हा एकदा राजकीय वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढून नंतर एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.