मुंबईचा डब्बेवाला संघटनेचे अध्यक्षांना अटक, तळेकरसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा

डब्बेवाल्यांना मोफत दुचाकीप्रकरणी सुभाष तळेकरला पुण्यातून अटक

0

मुंबई :  प्रसिद्ध मुंबईचा डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्यावर डब्बेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाअंतर्गत घाटकोपर पोलिसांकडून तळेकर यांना अटक केली आहे.

फेब्रुवारीमध्ये (२०२०) घाटकोपर पोलिस स्थानकात मुंबईच्या डब्बेवाल्यांनीच यासंबंधित  फसवणुकीची तक्रार  दाखल केली होती. त्यावेळी तळेकर मुंबई डब्बेवाला संघटनेचे पदाधिकारी होते. तेव्हा त्यांनी दुचाकी मोफत देण्याच्या नावाखाली डब्बेवाल्यांची काही कागदपत्र घेतली होती. पण, त्यानंतर डब्बेवाल्यांना दुचाकीविक्रेत्या कंपन्यांकडून फोन येऊ लागले. कारण, डब्बेवाल्यांच्या नावाने हे कर्ज काढण्यात आले होते. त्यामुळेच त्यांना कर्जाचे हप्तेही भरावे लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डब्बेवाल्यांनी मिळून तळेकर सोबत चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, घाटकोपर पोलिस ठाण्याकडून काही महिन्यांपासून यासंबंधीचा तपास सुरू होता. त्यानंतर तळेकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. यानंतर आता तळेकरांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.