‘मुंबई ते नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
नागपूर ते नाशिकपर्यंतचा समृद्धी महामार्ग मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी होणार खुला
औरंगाबाद : नागपूर ते नाशिक ‘समृद्धी’ महामार्गाचे काम औरंगाबादेत 37 तर जालन्यात 13 किमीचे काम पूर्ण झाले असून नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग एक मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,’ असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमाेर प्रेझेंटेशन करताना दिला.
राष्ट्रीय महामार्ग आणि ‘समृद्धी’ महामार्गाची आढावा बैठक घेण्यासाठी देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग एक मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,’ असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमाेर प्रेझेंटेशन करताना दिला. ‘मुंबई ते नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यावर डेडलाइनमध्ये कामे पूर्ण करावीत, असे आदेश देसाई यांनी दिले. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्निल मोरे, सिल्लोडचे ब्रिजेश पाटील, उपअभियंता व्ही. एन. चामले, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, शहर अभियंता एस. डी. पानझडे, नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अजय गाडेकर उपस्थित होते.