मुंबई-ठाण्याला विजेचा झटका, रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

तिन्ही मार्गांंवरील लोकल सेवा ठप्प, जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू

0

मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागांत वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामे ठप्प झाली. मुंबईतील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.

मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटही बंद झाले. त्या सरकारी आणि खासगी कार्यालयांतील काम ठप्प झालंं. तर इंटरनेट ठप्प झाल्यामुळे मोबाईलमधून मेसेजही जात नव्हते. सोशल मीडियाही अचानक ठप्प झाल्याने मुंबईकर थोडावेळ गोंधळून गेले होते. मुंबईत या भागात वीज गायब : दादर, लालबाग, परळ, प्रभादेवी, वडाळा, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, बोरिवली, मालाड, कांदिवली. बत्ती गुल, सर्व काही जागच्या जागी थांबले
मुंबईची बत्ती गुल झाल्यामुळे सर्व काही जागच्या जागी थांबले. विजेअभावी रेल्वेच्या तिन्ही लाईन ठप्प झाल्या. तीनही मार्गावरील लोकल आहे त्या ठिकाणी थांबल्या. नेमक्या कशामुळे लोकल थांबल्या हे प्रवाशांनाही बराच वेळ समजले नव्हते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.