मनपा पोटनिवडणूक : मुंबईमध्ये शिवसेना, पुण्यामध्ये राष्ट्रवादी तर नाशिकमध्ये मनसे विजयी

0

मुंबई महानगरपालिकेत सायनमधील प्रभाग क्रमांक 173मध्ये शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवसेनेचे रामदास कांबळे यांनी विजय मिळवून कांग्रेसचे उमेदवार सुनील शेट्टी यांना 845 मतांनी पराभूत केले आहे. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली.

पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनानंतर मुंढवा येथील प्रभाग क्रमांक 22 मध्ये जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या पोटनिवडणूकीत त्यांच्या जाऊबाई पूजा कोद्रे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले होते. राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे यांनी 8991 मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करत होते, मात्र असे होऊ शकले नाही.

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 (क) च्या पोटनिवडणूकत मनसेने विजय मिळवला. या पोटनिवडणूकीत मनसेच्या वैशाली भोसले यांनी विजय मिळवला आहे. मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मनसेने भोसले यांच्याच घरात वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.