मुंबई इंडियन्सने तब्बल सहा पट जास्त किंमत देत या खेळाडूला संघात केले दाखल…

या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी कोणत्या खेळाडूवर लावली एवढी मोठी बोली

0

चेन्नई : मुंबई इंडियन्सच्या संघाने या लिलावात तब्बल सहा पटीने जास्त बोली लावत एका खेळाडूला आपल्या संघात दाखल करुन घेतले. मुंबईचा संघ यावेळी सातत्याने या खेळाडूवर बोली लावत होता. हा खेळाडू नेमका आहे तरी कोण.
मुंबई इंडियन्सने यावेळी अॅडम मिल्ने या वेगवान गोलंदाजाला तब्बल सहा पट जास्त किंमत मोजत आपल्या संघात दाखल करुन घेतले. मिल्नेची बेस प्राइज यावेळी ५० लाख एवढी होती. यावेळी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये त्याला संघात घेण्यासाठी चांगली चुरस लागली होती. त्यानतर सनरायझर्स हैदराबादचा संघही त्याला घेण्यासाठी उत्सुक होता. त्यावेळी तब्बल ३ कोटी आणि २० लाख एवढी किंमत मोजत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले. मुंबई इंडियन्सच्या संघाला यावेळी वेगवान गोलंदाजाची गरज भासणार आहे. कारण लसिथ मलिंगानंतर त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजीचा चांगला पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मलिंगाची जागा भरण्यासाठी मिल्नेना यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या संघात दाखल करुन घेतले. आता ट्रेंट बोल्ड आणि जसप्रीत बुमरा यांच्याबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघात आता मिल्ने दिसणार आहे.

यावेळी मॅक्सवेलपेक्षाही सर्वांत जास्त बोली लागली ती ख्रिस मॅरिसवर. मॉरिसला संघात घेण्यासाठी पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉ़यल्स यांच्यामध्ये चांगलीच चढाओढ लागली होती. पण अखेर आतापर्यंतच्या लिलावात १६.२५ कोटी रुपये मोजत राजस्थान रॉयल्सच्या संघाने मॉरिसला आपल्या संघात दाखल करुन घेतले. आतापर्यंतची सर्वाधिक बोली ही त्याच्यावरच लागली गेल्याचे पाहायला मिळाले. स्मिथची बेस प्राइज होती ती २ कोटी. स्मिथला या किंमतीमध्येच संघात घेण्यासाठी आरसीबीचा संघ उत्सुक होता. पण त्यानंतर दिल्लीच्या संघाने २ कोटी २० लाख रुपयांची बोली स्मिथवर लावली आणि त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले. आयपीएलचा लिलाव सुरू झाला तो करुण नायरपासून. पण यावेळी करुणला कोणीही संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. त्यानंतर बोली लागलेला स्मिथ हा पहिलाच खेळाडू ठरला. पण स्मिथला यावेळी चांगला भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले नाही.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.