महावितरणचा एकनाथ खडसेंना शॉक, लॉकडाऊनमध्ये दिले एवढे बिल

महावितरणने पाठवलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे नागरिक त्रस्त

0

जळगाव : कोरोना लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पाठवलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे नागरिक त्रस्त आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही महावितरणने शॉक दिला आहे. लॉकडाऊनदरम्यान खडसेंच्या जळगावमधील मुक्ताईनगरमधल्या घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल पाठविण्यात आले आहे. एप्रिल ते जुलै, अशा ४ महिन्यांसाठी हे बिल आहे.
या बिलानंतर लॉकडाऊनदरम्यान आलेली अवास्तव असून ती न भरणारी असल्याचे खडसेंनी म्हणलं आहे. सरकारने या वीजबिलांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या बिलांमध्ये सवलत द्या, तसेच लोकांना वेठीला धरण्याचे काम करू नका, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
दरम्यान वीज बिलांच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोप केले आहेत. ‘महावितरणकडे पगार द्यायलाही पैसे नव्हते. ठाकरे सरकारने आम्ही पैसे देणार नाही, असे सांगितले. तेव्हा मंत्रालयात जादा वीजबिल पाठवण्याचा कट शिजला,’ असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. उर्जा विभागाने २० हजार कोटींची लूट केली आहे. जुलै महिन्याचा मीटररीडिंगला स्थगिती द्यावी, तसेच चुकीची बिले पाठवली म्हणून राज्य सरकारने माफी मागावी आणि खोटी बिले पाठवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ४० टक्के मीटररीडिंग घेतलीच नाहीत, आमच्याकडे अशी १०० वाढीव वीजबिले आहेत, ही बिले आम्ही उर्जामंत्र्यांकडे पाठवणार आहोत आणि राज्यपालांनाही भेटणार आहोत, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.