‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’ खासदार सुप्रिया सुळेंची मोदींच्या पुणे दौऱ्यावर टीका

पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली नाहीतर कोणीतरी म्हणायचे मीच शोधली

0

पुणे : ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या पुणे दौऱ्यावर टीका केली आहे. एक लाख कोटींच्यावर गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचे मीच (स्वतःबाबत) शोधली, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला.
त्या पुण्यात आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होत्या. देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरू असताना या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (28 नोव्हेंबर 2020) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. यावरच सुप्रिया सुळे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाची लस पुण्यामध्येच तयार झालेली आहे. पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे. त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी दावा करेल तर गैरसमज नसावेत, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले असून मोदी कॉन्फरन्सिंगद्वारे शास्त्रज्ञांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर लसीची चाचणी, त्याचे वितरण याचीही माहिती घेणार आहेत. खरंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील तीन शहरांचा दौरा केला. मोदींनी अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा केला. या तिन्ही ठिकाणी कोरोना लसीच्या निर्मिती केली जात आहे. त्यानुसार मोदींनी कोरोना लसीच्या प्रगतीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींचा दौरा अहमदबादमधील जेडियस बायोटेक पार्क या ठिकाणाहून सुरू केला. त्यानंतर ते पुण्यात आले आहेत. पुण्यानंतर मोदी हैदराबादमधील भारत बायोटेक या ठिकाणी भेट देणार आहे. भारत बायोटेक ही कंपनी कोरोनाची स्वदेशी लसीची निर्मिती करत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.