खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांचा वाद शिगेला

'वडेट्टीवार खासगीत म्हणतात, मराठा समाजाला ओबीसीत घ्या' : संभाजीराजे छत्रपती

0

उस्मानाबाद :  मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले.  आता खासदार  संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद टोकाला पोहोचला.  ‘मंत्री विजय वडेट्टीवार बाहेर वेगळी भूमिका घेतात. वडेट्टीवार खासगीत ओबीसीत मराठा समाजाला घ्या म्हणतात. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असे खळबळजनक वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

ते म्हणाले की,  वडेट्टीवार यांच्यामुळे मी फार दुःखी आहे. ओबीसीमधून आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे.  वडेट्टीवार मला म्हणाले, होते की, ओबीसीमधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी म्हणालो, कृपया असे करू नका.  वडेट्टीवार असे का वागत आहेत माहित नाही, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. खासदार संभाजीराजे म्हणाले की, मी कधीही तलवार काढू असे म्हटले नाही. सारथी विषयी आणि माझ्याविषयी वडेट्टीवारांना आकस आहे. तोच पुन्हा बाहेर येतोय. महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सूरू आहे.  सत्ताधारी पक्षातील काही मंडळी आहेत. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा  अर्थ काढला. वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरं बोलत आहेत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. त्यांनी असे करू नये, त्यांनी माझे संपूर्ण भाषण ऐकावे, असे संभाजीराजे म्हणाले. ते म्हणाले की, एमपीएससी परीक्षेच्या बाबतीत माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील, तरीही परीक्षा झाल्या तर सकल मराठा समाज जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे.   जर बहुजन समाजाबद्दल माझ्या मनात काही असेल तर मला छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवण्याचा अधिकार नाही, असंही संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे म्हणाले की,  समाजातील लोक आक्रमक होते,  आम्ही तलवार काढली, तुम्ही आदेश द्या म्हणत होते, मी म्हणालो तुम्ही काही करू नका, गरज पडली तर मी आहे. समाजाला शांत करण्यासाठी मी तसे बोललो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.