खासदार रक्षा खडसेंचा निर्धार, सोमवारी ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

इतर जिल्ह्यांतील मंत्री पॅकेज घोषित करतात, मग जळगावात का नाही? - रक्षा खडसे

0

जळगाव : रावेरमधील भाजप खासदार रक्षा खडसे  येत्या 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात  रस्त्यावर उतरणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणास्तव रक्षा खडसे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यलयासमोर त्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे सर्व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी, केळी उत्पादक 2019 या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत कोणत्याही प्रकारची आढावा बैठक घेण्यात आलेली नाही, असा दावा केला जात आहे. महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरली, तरी राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी जळगाव भाजपतर्फे रक्षा खडसे 9 नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मागणी करुनही राज्य सरकार लक्ष देत नाही. इतर जिल्ह्यातील मंत्री हे त्या ठिकाणी जाऊन पॅकेज घोषित करत आहेत, मग जळगावात का नाही? असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.