खासदार हेमंत पाटील यांनी शिवसैनिकाच्या घरी भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी…

मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट, दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा !

0

हिंगोली   : कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील अपघाती निधन झालेले शिवसैनिक सचिन मिराशे यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांत्वनपर भेट देऊन खासदार हेमंत पाटील यांनी मानसिक आधार देत सामाजिक बांधिलकी जपली. आणि त्यांच्या  टुंबियांसोबत दिवाळी साजरी करून शासनाकडून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. सोबतच मतदारसंघात अनेक ठिकाणी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील शिवसेना कार्यकर्ते कार्यकर्ते सचिन मिराशे यांचे नुकतेच विहिरीत ट्रॅक्टर पडून दुर्दैवी निधन झाले. त्यांचे कार्य आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते सर्वत्र परिचित होते. ऐन कार्यकर्तृत्वाच्या दिवसात त्यांच्या अचानक अपघाती निधनामुळे संपूर्ण जिल्हाभर हळहळ व्यक्त करण्यात आली. खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा यावेळी दिल्लीस्थित असतानाही शोक व्यक्त केला. ऐन सणासुदीच्या दिवसांत मिराशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने खासदार हेमंत पाटील यांनी मतदारसंघात परत आल्यावर यंदाची दिवाळी मिराशे कुटुंबासोबत साजरी करण्याचे ठरवून त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन आर्थिक मदत केली आणि शासनाची सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी घोडाकामठा, येथील स्वातंत्र सेनानी वत्सलाबाई देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. तसेच येलकी, येहळेगाव (तुकाराम) या ठिकाणी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत डॉ.सोमेश्वर पतंगे. डॉ. दत्तात्रय काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डी.के.दुर्गे, कळमनुरी पं.स. उपसभापती, अजय उर्फ गोपु पाटील, कृष्णा पाटील-भिसे, सोपान पाटील बोंढारे, विजयराव पाटील बोंढारे, मुन्ना भाऊ देशमुख बाजार समिती सदस्य, भरत देसाई, पिंटू भाऊ देशमुख उगले आदींची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.