राज्यातील हळद उत्पादकांचे नेतृत्व खासदार हेमंत पाटील यांनी करावे- कृषीमंत्री

हळदीला देशात प्रथम पसंती मिळावी, याकरिता खासदार हेमंत पाटील यांचे कार्य मोलाचे

0

हिंगोली : महाराष्ट्रातील हळदीला देशात प्रथम पसंती मिळावी, याकरिता खासदार हेमंत पाटील मोलाचे कार्य करत आहेत. दर्जेदार हळद उत्पादन ही महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करावी आणि त्यांनी केवळ हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार न करता, संपूर्ण महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे, असे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा कृषी आढावा बैठकीत काढले.
जिल्हा कृषी आढावा बैठकीत हळद उत्पादन ही महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करावी आणि त्यांनी केवळ हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार न करता, संपूर्ण महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे, असे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी काढले. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यातील हळद बोर्ड, कृषी योजना, पीककर्ज वाटप ,पीकविमा यांचा आढावा घेतला. खासदार हेमंत पाटील यांच्या प्रभावशाली कार्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघ कात टाकत आहे. नवनवीन उद्योग व्यवसाय जिल्ह्यात येत असून हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळामुळे नवी ओळख हिंगोली जिल्ह्याला अर्थात महाराष्ट्राला प्राप्त होणार आहे. खासदार हेमंत पाटील हे अत्यंत अभ्यासू आणि शेतकरीहित जपणारे लोकप्रिय खासदार आहेत. त्यानी आता महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे आणि राज्यातील हळदीला नवी ओळख निर्माण करून द्यावी. असेही कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले . हळद बोर्ड स्थापन करण्याच्या उद्देशाने अभ्यास समितीने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हळदीचे उच्च प्रतीचे बेणे यावर प्रक्रिया संशोधन करणे गरजेचे आहे. हळदीची योग्य ब्रँडिंग, योग्य बाजारभाव याचे नियोजन करावे.सोबतच मालाची स्वच्छता, ग्रेडींग, पँकिंग यातून शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे कसे मिळतील याकडेही लक्ष द्यावे. अशा सूचनाही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.