खंडाळा घाटात पहाटे ट्रॅव्हल्सचा अपघात, दुर्घटनेत 25 प्रवासी जखमी, 1 ठार
पुणे ते यवतमाळ जाणाऱ्या 'लिबर्टी ट्रॅव्हल्स'ला अपघात
पुणे : खंडाळा घाटात पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दुर्घटनेत जवळपास 25 प्रवासी जखमी, 1 ठार झाल्याची माहिती आहे. पुणे ते यवतमाळ ‘लिबर्टी ट्रॅव्हल्स’ वाशिमकडून पुसदकडे येणारी ट्रॅव्हल यवतमाळ मार्गे जाणार होती. जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खंडाळा घाटात बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी आज पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला.
खंडाळा घाटात आज पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दुर्घटनेत जवळपास 25 प्रवासी जखमी, 1 ठार झाल्याची माहिती आहे. पुणे ते यवतमाळ लिबर्टी ट्रॅव्हल्स वाशिमकडून पुसदकडे येणारी ट्रॅव्हल यवतमाळ मार्गे जाणार होती. पुसद तालुक्यातील पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खंडाळा घाटात बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ड्रायव्हरचे रस्त्याच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये वीस ते पंचवीस प्रवासी जखमी असून 17 प्रवाशावर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.