भररस्त्यात विनयभंग, तरुणीची आत्महत्या; संतप्त जमावाने तरुणास बदडले

विनयभंग, अश्लील शिवीगाळ केल्याने, कीटकनाशक प्राशलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नणुन्द्रे येथे हा संतापजनक प्रकार घडला.तरुणांनी भररस्त्यात विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ केल्याने कीडनाशक प्राशन  केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपींच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची नासधूस केली

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नणुन्द्रे येथे हा संतापजनक प्रकार घडला.  संशयित अजित प्रदीप आणि अक्षय यांनी 23 ऑक्टोबरला कोलोली ते तेलवे रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीला अडवून तिचा विनयभंग केला होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने त्याच दिवशी सायंकाळी विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असताना काल रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजित पाटील, अक्षय चव्हाण आणि प्रदीप पाटील यांच्याविरोधात पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच, संशयित अजित पाटील यानेही कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे नणुन्द्रे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारी म्हणून पोलिसांनी गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. जिल्ह्यात महिला अत्याचाराची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील सावे येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर 55 वर्षीय व्यक्तीने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच तरुणांच्या छेडछाडीला घाबरुन तरुणीने आत्महत्या केली. या दोन्ही घटनेतील आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.