अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी मोहन भागवत, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी पोहोचले मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी

0

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.
सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची बैठक महत्त्वाची मानली जाते. दरम्यान, ही कौटुंबिक भेट असल्याचे मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले. खूप दिवसांपासून आम्हाला भेटायचे होते. पण आमच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे वेळ मिळत नव्हती, असे चक्रवर्तींनी सांगितले. मोहन भागवत यांनी आज घरी येऊन नाश्ता केला. नागपूरला त्यांनी मला सहकुटुंब बोलवले आहे, असेही मिथुन चक्रवर्तींनी सांगितले.

चक्रवर्ती-भागवत यांची आधीही भेट

मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांची ही पहिलीच भेट नाही. ऑक्टोबर 2019 मध्येही दोघांची भेट झाली होती. नागपुरातील संघ कार्यालयात त्यावेळी दोघे भेटले होते. पश्चिम बंगाल निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मिथुन चक्रवर्ती हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार होते. मात्र वारंवार गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्तींना भाजप विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिथुन यांची भेट घेऊन मोहन भागवत यांच्या माध्यमातून भाजप चक्रवर्तींना आपल्याकडे खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.