भारताचा तुफानी गोलंदाज मोहंमद सिराजचे वडील मोहंमद चाऊस यांचे निधन

53 वर्षांचे मोहंमद चाऊस यांनी घेतला अखेरचा श्वास ,

0

हैदराबाद : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारताचा तुफानी गोलंदाज मोहंमद सिराज  याच्या वडिलांचे निधन झाले आहे. फुफ्फुसाच्या आजारामुळे मोहंमद सिराजचे वडील मोहंमद चाऊस यांचे शुक्रवारी निधन झाले, ते 53 वर्षांचे होते. मोहंमद सिराजला त्याचे वडील विश्वात नसल्याचा निरोप दिला.

सिराज हा टीम इंडियासोबत सध्या सिडनीमध्ये आहे. सराव करून आल्यानंतर सिराजला वडिलांच्या निधनाचे  सांगण्यात आल्याचे वृत्त स्पोर्ट्स स्टार या वेबसाईटने दिले आहे. देशाचे नाव मोठे कर, असे माझे वडील नेहमी म्हणायचे, मी ते नक्कीच करीन, असे मोहंमद सिराज स्पोर्ट्स स्टारशी बोलताना म्हणाला. माझ्यासाठी हे धक्कादायक आहे. मी आयुष्यातील सगळ्यात जास्त पाठिंबा देणारा माणूस गमावला आहे. देशासाठी मला खेळताना बघणे हे त्यांचंे स्वप्न होते. मी ते पूर्ण करून त्यांना आनंद दिला, अशी प्रतिक्रिया मोहंमद सिराजने दिली. कोरोना व्हायरसमुळे असलेल्या क्वारंटाईनच्या नियमांमुळे मोहंमद सिराज वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी भारतात येऊ शकणार नाही. आयपीएलच्या या मोसमात मोहंमद सिराजने उल्लेखनीय कामगिरी केली. 21 ऑक्टोबरला कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये सिराजने विक्रम केला होता. या मॅचनंतर त्याने आपले वडिल आजारी असल्याचे सांगितले होते. ‘माझे वडील आजारी आहेत. फुफ्फुसाचा आजार झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. मला त्यांची काळजी वाटते. मी घरी जाऊन त्यांना प्रोत्साहन देऊ शकत नाही. मी त्यांच्याशी फोनवर बोलतो, पण ते रडायला सुरूवात करतात. त्यामुळे मी फोनवर त्यांच्याशी जास्त बोलू शकत नाही. त्यांना रडताना मला बघवत नाही. त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करा,’ असं सिराज म्हणाला होता.

वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले

मोहंमद सिराजचा क्रिकेटसाठीचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला. हैदराबादमधल्या गरीब कुटुंबामध्ये सिराजचा जन्म झाला. सिराजच्या वडिलांनी रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. पण रिक्षाचालक असूनही त्यांनी सिराजला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. सिराजला क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी नेहमी आणून दिल्या. मोहंमद सिराज दिवसभर क्रिकेटचा सराव करायचा, एवढच नाही तर कित्येक वेळा रात्रीही सराव केल्यामुळे सिराजला आईचा मारही खावा लागला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.