मोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी अदानी – अशोक ढवळे
शेतकरी नेते अशोक ढवळेंचा मोदी शाहांवर घणाघात
मुंबई : अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी दाखल झाला. शेकडो किलोमीटर अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले. यामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळाासाहेब थोरात आझाद मैदानावर उपस्थित होते.
शेतकरी नेते अशोक ढवळेंचा मोदी शाहांवर घणाघात,मोदींचे हम दो म्हणजे मोदी-शाह, तर हमारे दो म्हणजे अंबानी अदानी आहेत. मोदी-शाहांनी देशातील सर्व विकायला काढले. आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला मात्र आम्ही हे होऊ देणार नाही, असा इशारा अशोक ढवळे यांनी दिला आहे. दरम्यान आझाद मैदानावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दादर येथील गुरुद्वाराने शेतकऱ्यांसाठी तब्बल 25 हजार पुलावाची पाकिटे, फळे, डाळ आणि चपातीची व्यवस्था केली. गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणामध्ये केळी, डाळ-चपातीचे वाटप केले. शेतकऱ्यांसाठी अन्न वाटपाची व्यवस्था पाहणाऱ्या दलजित सिंग यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. अनेक राजकीय नेते सुद्धा मदतीसाठी पुढे आले असून त्यांनी सुद्धा अन्न व पाण्याची व्यवस्था केली.