‘मनसे’चे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर
सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्यासाठी विनापरवानगी प्रवास करून कायदेभंग आंदोलन
मुंबई : ‘मनसे’ने मुंबई आणि उपनगरात सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी, यासाठी विनापरवानगी लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले होते.
‘मनसे’ने मुंबई आणि उपनगरात सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी, यासाठी विनापरवानगी लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले. या आंदोलनाप्रकरणी ‘मनसे’ नेते संदीप देशपांडे गजानन काळे, संतोष धुरी आणि अतुल भगत या चौघांना कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. चौघांचीही कल्याण रेल्वे न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता केली आहे. चौघांना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर ‘मनसे’ने केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने या चौघांचीही प्रत्येकी 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता केली.