वाढीव वीजबिलविरोधात मनसेचा राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा 

मनसेच्या मोर्चाला मुंबई पोलिसांचा नकार, पण मोर्चा काढण्यावर कार्यकर्ते ठाम

0

मुंबई :  वाढीव वीज बिलविरोधात मनसेचा गुरुवारी, 26 नोव्हेंबर  रोजी संपूर्ण राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यापैकी सर्वात मोठा मोर्चा हा मुंबईत नियोजित करण्यात आला आहे. मात्र, या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर मुंबई पोलिसांच्या नकारानंतरही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे.

सर्वात मोठा मोर्चा हा मुंबईत नियोजित करण्यात आला आहे. मात्र, या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर मुंबई पोलिसांच्या नकारानंतरही मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे. मुंबईत म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा हा मोर्चा निघणार होता. या मोर्चासाठी मनसेने परवानगी मागतली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे सुरक्षेचे कारण सांगत पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. पण पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन देण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सैनिक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. राजयोग हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा निघणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे

‘मोर्चा शांतपणे निघेल’

वीजबिल विरोधात निघणारा मोर्चा अतिशय शांतपणे निघेल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. मोर्चाबाबत राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोर्चेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे, अशी सूचना देण्यात आली आहे, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.वाढीव वीजबिल विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याआधी 19 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मनसेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली होती. “राज्यातील जनतेला वाढीव बिलाचा शॉक बसल्यानंतर मनसेचे शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले, त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकाऱ्यांना भेटले. अदाणी ग्रुपचे अधिकारी राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदने मागवली. आम्ही ही निवेदने दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला विश्वास आहे, पवारसाहेबांचा… कारण राज ठाकरे बोलल्यानंतर पवारसाहेब म्हणाले होते, राज्य सरकारशी बोलतो. पण मला वाटते पवारसाहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही”, असे नांदगावकर म्हणाले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.