औरंगाबादमध्ये मनसेकडून ‘जैन इंटरनॅशनल स्कूल’मध्ये तोडफोड

शाळा प्रशासन पालकांकडून ऑनलाइन शिक्षणाची फी सक्तीने वसुली

0

औरंगाबाद : शहरातील शहरानूर मियाँ दर्गा परिसरात असलेल्या दि जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये गुरुवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. शाळा प्रशासन पालकांकडून ऑनलाइन शिक्षणाची फी सक्तीने वसूल करत होती, असा आरोप मनसे विद्यार्थी आघाडीने केला आहे.ज्या विद्यार्थ्यांचे पालक फी भरत नाहीत, त्यांना ऑनलाइन अभ्यासासाठीच्या तासिकेची दिलेली लिंक बंद करण्यात आल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

 शहरातील शहरानूर मियाँ दर्गा परिसरातील  दि जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये शाळा प्रशासन पालकांकडून ऑनलाइन शिक्षणाची फी सक्तीने वसूल करत होती, असा आरोप मनसे विद्यार्थी आघाडीने केला. ज्या विद्यार्थ्यांचे पालक फी भरत नाहीत,, त्यांना ऑनलाइन अभ्यासासाठीच्या तासिकेची दिलेली लिंक बंद करण्यात आल्याचे मनसेचे म्हणणे आहे.त्यामुळे ही तोडफोड करण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे. तर शाळा प्रशासनाने सांगितले की, प्रवेश घ्यायचा आहे, असे कारण सांगून दोन जणांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्यापैकी कोणाचेही पाल्य आमच्या शाळेत नाही. अचानक येऊन ही तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे शाळेतील शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता प्रवेश घ्यायचा आहे. असे सांगून दोन जणांनी मुख्याध्यापक संतोष कुमार यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केली जाते आणि शुल्क आकारणी संदर्भात चर्चा सुरु केली. नंतर अचानक मिसकॉल येताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत बसलेलीच खुर्ची उचलून तोडफोड करण्यास सुरुवात केली. टेबलची काच आणि खिडकीची काच फोडून घोषणा देत निघून गेले. या सर्व प्रकारामुळे सुरक्षेबाबत भिती व्यक्त करत आज (शुक्रवार) रोजी शाळेचा ऑनलाइन क्लास बंद राहिल, अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली. शुल्क वसुलीसाठी सक्ती केली जात नाही, पालकांना विनंती करण्यात आलेली आहे. शाळा कशी चालवायची असे प्रकार व्हायला लागले तर शाळा बंद करावी लागेल. शाळा प्रशासन आणि पालकांच्या मधील ही बाब असून, यात त्यांचा काय संबंध, असे मुख्याध्यापक संतोष कुमार यांनी म्हटले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.