काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही हे सरकार बेकार, राज ठाकरेंचा टोला

0

इंटरनेट आणि मोबाईलमध्ये हेरगिरी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय भाजप सरकारला पराभूत करणारा आहे. राम मंदिराचा मुद्दा काढून दंगली घडवण्याचा सरकारचा कट आहे. हे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारपेक्षाही बेकार आहे, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. राज ठाकरे नाशिक दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

भाजप सरकारवरील राग जनतेने मतांच्या माध्यमातून केला. त्यामुळे त्यांना मागील निवडणूकीत तीन राज्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची शक्यता त्यांनी नाकारली. भाजप फावड आणि कु-हाड एकाचवेळा पायावर मारून घेणार नाही, असाही खोचक उत्तर राज यांनी दिले.

अमितचे लग्न साध्या पद्धतीने…

राज ठाकरे यांचा मुलगा अमित यांचा विवाह होणार आहे. अमितचा विवाह अगदी साध्या पद्धतीने होणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. सर्वपक्षांच्या हितचिंतकांना आमंत्रण दिले तर तो आकडा सहा लाखांच्या घरात जातो. त्यामुळे मोजक्याच लोकांना आमंत्रण देणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.