नाशिकमध्ये भर रस्त्यावर स्कोडा गाडीमध्ये मनसे नेत्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
मनसे नेते नंदू आबा शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती
नाशिक : कामटवाडे येथील मनसे नेते नंदू आबा शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कामटवाडे येथील मनसे नेते नंदू आबा शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी सटाणा-साक्री रोडवर स्कोडा गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.