मनसेचे नेते अमित ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने ‘लीलावती’त दाखल

ठाकरे कुटुंबातील भावुक क्षण, मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे 'लीलावतीत

0

मुंबई : मनसेचे नेते अमित ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मुंबईतील ‘लीलावती’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाला दाखल कल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ‘लीलावती’ रुग्णालयामध्ये पोहोचले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांना ‘लीलावती’ रुग्णालयातमध्ये रविवारी रात्री दाखल करण्यात आले. अमित ठाकरे यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप आला होता, तसेच प्रकृतीही ठीक नव्हती. त्यामुळे अखेर खबरदारी म्हणून  रुग्णालयातमध्ये दाखल केले आहे. आज दुपारी 12.15 च्या सुमारास राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसह ‘लीलावती’मध्ये पोहोचले. लीलावती मध्ये दाखल करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली. पण, सुदैवाने कोविडची चाचणी ही निगेटिव्ह आली . तसेच मलेरिया आणि इतरही चाचण्या करण्यात आल्या आहेत. पण, त्यांचेही अहवालही निगेटिव्ह आला आहे. व्हायरल फिव्हर असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पण, कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून पुढील दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयामध्ये ठेवण्यात येणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.