…त्यांची ही धडपड पाहून मनसे प्रमुख राज ठाकरे भारावले

हॉटेल विश्वात आपलं वेगळे स्थान निर्माण करण्याचे स्वप्न

0

कोल्हापूर : हॉटेल विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचे स्वप्न उरी बळगलेल्या तिघींनी कोल्हापूरमध्ये चक्क पाणीपुरी आणि शिवपुरी गाडी सुरू केली आहे. ऐश्‍वर्या, श्रद्धा आणि गीता असं त्या महाविद्यालयीन युवतींची नावे आहेत.

आठवड्यापूर्वी या तिघी मैत्रिणींनी अंबाई टॅंकसमोर पाणीपुरी, शेवपुरीची गाडी सुरू केली. ज्या वयामध्ये इतर मुले आई-पप्पांकडून पॉकेटमनी घेऊन मज्जा मारतात, त्याच वयात या तिघी मैत्रिणींनी पाणीपुरी, शेवपुरीची गाडी टाकून आपले स्पप्न पूर्ण करण्याचा नवीन मार्ग शोधून काढला. त्यांची ही धडपड पाहून मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील भारावले. चक्क राज ठाकरेंनी  ऐश्‍वर्या, श्रद्धा आणि गीता यांचे कौतुक केले आहे. शिवाय ‘मनसे वृतांत अधिकृत’ या आपल्या फेसबुक पेजवर  ऐश्वर्या, श्रद्धा व गीताची यशोगाथा शेअर करून तरुणींना आणखी बळ दिले आहे. सध्या सोशल मीडियावर ‘त्या तिघींची धडपड’ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऐश्‍वर्या, गीता राजाराम महाविद्यालयात विज्ञान शाखेत (एफ.वाय.) शिकतात तर श्रद्धा डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्किटेक्‍टच्या दुसऱ्या वर्षाला आहे. शिक्षणावर दुर्लक्ष न करत त्यांनी दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाणीपुरी, शेवपुरीची गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. काका, मामा, दादा, भावा, काकू, मावशी असा ग्राहकांशी संवाद साधत त्यांचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. कोल्हापुरातील त्या कॉलेज तरुणीची एक धडपड व, आपले आयुष्य आपण नव्या व आपल्या स्वतःच्या हिमतीवर साध्य करता येते हे या तिघींनी दाखवून दिले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.