राज्यातील मोठ्या जीएसटी घोटाळ्यात आमदाराच्या मुलाला अटक

520 कोटींचे बनावट बीलप्रकरण, : सुनील गुट्टेसह व्यावसायिक सहकारी विजेंद्र रांका यांनाही अटक

0

मुंबई : तब्बल 520 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात (जीएसटी योजना) राज्यातील एका आमदाराचा पूत्र आणि सुनील हायटेकचे व्यवस्थापकीय संचालक (मुख्य व्यवस्थापक) सुनील गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे.

520 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात (जीएसटी योजना) राज्यातील एका आमदाराचा पूत्र आणि सुनील हायटेकचे व्यवस्थापकीय संचालक (मुख्य व्यवस्थापक) सुनील गुट्टे यांना अटक करण्यात आली. जीएसटी इंटेलिजन्स महानिदेशालयाच्या (डीजीजीआय) मुंबई विभागाच्या टीमने या फसवणुकीच्या प्रकरणात गुट्टे यांना अटक केली आहे. सुनील गुट्टे यांचे वडील महाराष्ट्रात आमदार आहेत. सुनीलसह त्याचे व्यावसायिक सहकारी विजेंद्र रांका यांनाही अटक केली आहे. या दोघांना घोटाळ्याचा सूत्रधार मानले जात आहे. जीएसटी इंटेलिजन्स यूनिट देशभरात जीएसटीमधील घोटाळ्याचा शोध घेण्याचं अभियान चालवत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील हायटेक इंजिनिअर्स याने बनावटी बिलांच्या आधारावर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले. यासाठी कोणत्याही प्रकारच्या माल वा सेवा दिली गेली नव्हती. याशिवाय आरोपी कंपनीचे टर्नओव्हर वाढवून दाखविण्यात आले होते. ही कंपनी बँकांकडून लोन किंवा क्रेडिट लिमिट मिळवत होते. या घोटाळ्याचे मास्टरमाइंड सुनील रत्नाकर गुट्टे यांचे वडील रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्रातील परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सुनील हायटेक या कंपनीत ते संचालकदेखील आहे. त्यांचे भाऊ चित्रपट दिग्दर्शक आहेत. या दिग्दर्शक भावालादेखील 2018 ऑगस्टमध्ये बनावटी जीएसटी रिफंड घेण्याबाबत अटक करण्यात आली होती. सुनीलचे वडील रत्नाकर एक साखर कंपन्याचे मालक आहेत. त्यांच्यावरही 2017 मध्ये महाराष्ट्र पोलिस आणि प्रवर्तन निदेशालयाने 6 बँकांकडून 328 कोटी रुपयांचा लोन घेताना फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यांनी परभणी जिल्ह्यात तब्बल 2298 शेतकऱ्यांची नावे देऊन लोन घेतले होते आणि महत्त्वाचे म्हणजे यापैकी अनेक शेतकऱ्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. यादरम्यान मुंबईचे माजी कमिश्नरच्या एन्टी इव्हेजन टीमने मेसर्स ओंकार वेंचर्स प्रायवेज लिमिटेडच्या परिसरात सर्च ऑपरेशन केले होते. यामध्ये कंपनीला तब्बल 1.44 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट परत करावे लागले, कारण ते यासाठी सप्लाटर दाखवू शकले नव्हते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.