छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांचे भरपावसात भाषण

आजोबांच्या पावलावर नातवाचे पाऊल, रोहित पवारांच्या नगरच्या सभेची महाराष्ट्रभर चर्चा

0

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये भरपावसात भाषण केले. उपस्थितांनी देखील पावसात उभे राहून हे भाषण ऐकले. या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण काढली जाते.
रोहित पवार यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात भर पावसात उपस्थितांना संबोधन करत त्यांच्या उपक्रमांचे कौतुकही केले. हा शिवजयंती कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.रोहित पवार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आज (19 फेब्रुवारी) जामखेडमध्ये आले होते. त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मात्र, अशाही स्थितीत रोहित पवार यांनी आपले भाषण बंद न करता उपस्थितांशी संवाद सुरूच ठेवला.
रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले, “आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही तरुणांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. आज करण्यासारखे खूप काही होते. मात्र अचानक पाऊस आला. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मी आयोजकांना एवढेच सांगतो की, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता.”“दिवस चांगला होता. अशाच प्रकारे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत राहा, असे आवाहनही रोहित पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, पाऊस सुरू असतानाही रोहित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधल्याने अनेकांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली,” असेही रोहित पवार यांनी नमूद केले.

भरपावसातील भाषणात शरद पवार काय म्हणाले होते?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी साताऱ्यात भरपावसात भाषण केले होते. 18 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या भाषणात, शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला होता. शरद पवार म्हणाले होते, “चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली. हे मी जाहीरपणे साताऱ्यात कबूल करतो. ती चूक दुरुस्त करण्यासाठी साताऱ्यातील घराघरांतील तरुण, वडिलधारी सगळेजण 21 ऑक्टोबरची (मतदाना दिवशीची) वाट पाहात आहेत. ते मतदानाच्या दिवशी आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. यातून सातारकर आम्ही लोकांनी जी काही चूक केली त्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो घेतील.”

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.