आमदार रवी राणांची सुटका; राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा त्यांचा आरोप

खासदार नवनीत राणा रविवारी मुंबई रवाना, 'मातोश्री'समोर उद्या आंदोलन

0

अमरावती : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. रविवारी अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. अखेर रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून बाहेर येताच, आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले. राज्य सरकारवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचे आमदार राणा  म्हणाले. हजारो शेतकऱ्यांसह सोमवारी ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आमदार रवी राणा यांनी तीन दिवसांपूर्वी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. रवी राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने 20 शेतकऱ्यांसह रवी राणा तीन दिवसांपासून अमरावती कारागृहात आहेत. आमदार राणा कारागृहात असून प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप केला.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा रविवारी शेतकऱ्यांना घेऊन मुंबई रवाना होणार असून उद्या (सोमवारी) मातोश्री समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी, लॉकडाऊन काळात आलेले वीजबिल निम्मे माफ करण्यात यावे आणि तुरुंगात असलेले आमदार रवी राणा यांची सुटका करावी, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरल्या.अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या रविवारी नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शहरातील राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. सरकार विरोधात घोषणाबाजी करत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत आंदोलन केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अटक करण्यात आली. त्यांची रवानगी ही कारागृहात करण्यात आली. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्या अटकेबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून रवी राणा यांच्या अटकेबद्दल ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.’शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’ असे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी जेलभरो आंदोलन केलं होते. आमदार रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.