आमदार गोपीचंद पडळकरांची उच्च न्यायालयात याचिका, आज होणार सुनावणी

विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक अवैध ठरवा!

0

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी  विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक अवैध ठरवण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत उपस्थित मुद्यांवर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची या निवडणुकीत उपसभापती पदावर निवड झाली. राज्य विधिमंडळाच्या नियमांना डावलून यंदा विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यात आली, असा प्रमुख आरोप या याचिकेतून केला. बाजू मांडण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाकडे अवधी मागितला. न्यायालयाने ही विनंती मान्य करत आज 3 नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी निश्चित केल आहे.

ऑगस्ट 2020 महिन्यामध्ये उपसभापती निवडणुकीबाबत आरंभ झाला . त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोरोना चाचणी करुनच सदस्यांना सभागृहात प्रवेश दिला जाईल. याबरोबरच अन्यही काही नियमही जारी केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी याचिकाकर्ते गोपीचंद पडळकर कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला. दरम्यान, 7 स्प्टेंबर रोजी अध्यक्षांनी निवडणूक दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबरला जाहीर केली आणि त्यात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाली. मात्र या सर्व अधिवेशन प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केले असून नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती ही अवैध आहे, असा दावा या याचिकेतून केला. विधिमंडळाचे अनेक सदस्य या चाचणीत कोरोनाबाधित आढळले होते, त्यामुळे त्यांना या निवडणुकीपासून वंचित राहावे लागले, असा दावाही त्यांनी या याचिकेतून केला आहे. निवडणूक मतदानासाठी ऑनलाईन व्यवस्था केली नव्हती आणि निवडणुकीत सहभागी व्हायचे आहे, त्यामुळे ती तूर्तास तहकूब करा, ही काही सदस्यांची मागणीही मान्य केली गेली नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. यावर बाजू मांडण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाकडे अवधी मागितला. न्यायालयाने ही विनंती मान्य करत 3 नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी निश्चित केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.