आमदार डॉ. गुट्टे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे; रस्त्यासह स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी

सिरपूर ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन उपोषण मागे

0

पालम : पालम  तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी  सार्वजनिक स्मशानभूमी व रस्त्याचा प्रश्न धसास लावल्यानंतरच सिरपूर ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले. दरम्यान, आमदार डॉ. गुट्टे यांनी आगामी दोन दिवसात रस्त्याच्या डागडुजीस सुरुवात करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता  डबीटवार यांना दिले आहेत.

पालम  तालुक्यातील सिरपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी  सार्वजनिक स्मशानभूमी व रस्त्याचा प्रश्न धसास लावल्यानंतरच सिरपूर ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले. दरम्यान, आमदार डॉ. गुट्टे यांनी आगामी दोन दिवसात रस्त्याच्या डागडुजीस सुरुवात करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता  डबीटवार यांना दिले आहेत. संचारबंदीमुळे चार ग्रामपंचायत सदस्यांनी सिरपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर 25 मार्च 2021 पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. हे उपोषण सोडण्यासाठी पालम तहसील प्रशासनाचे कर्मचारी पहिल्या दिवशी उपोषण स्थळी आले होते. परंतु ऊपोषणकर्त्याना त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नव्हते. म्हणून उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी (ता.26) आमदार डॉ. गुट्टे यांनी सकाळी साडेअकरा वाजता उपोषणकर्त्यांना भेट दिली. उपोषणस्थळावरूनच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर यांच्याशी फोनवर संवाद साधून रस्त्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासंदर्भात चर्चा केली. कोणत्या मार्गाने हा रस्ता तातडीने होईल, याची चर्चा केली. तेव्हा येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केरवाडी ते सिरपूर रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन डॉ. गुट्टे यांनी श्री. विटेकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दिले. तत्पूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याचे आदेश डॉ. गुट्टे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री. डबीटवार यांना दिले आहेत.
सोबतच गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तिचा मोबदला देऊ, असे आश्वासन गटविकास अधिकारी आर.व्ही. चकोर यांनी आमदार डॉ. गुट्टे यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिले. तेव्हा स्मशानभूमीचा विकास आपण स्वतः करेल, अशी ग्वाही डॉ. गुट्टे यांनी दिली. तत्पूर्वी डॉ. गुट्टे यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी स्मशानभूमी संदर्भात चर्चा केली होती. म्हणून ग्रामस्थांच्या विनंतीवरून उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. डॉ. गुट्टे यांनी उपसरपंच सदाशिव लांडे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर हनवते, राहुल आवरगंड, भास्कर लांडे यांना लिंबूपाणी देऊन उपोषण मागे घेतले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप आळनुरे पाटील, गुट्टे काका मित्र मंडळाचे पालम व पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष नारायण दुधाटे, युवा तालुकाध्यक्ष भगवान शिरस्कर, चंद्रकांत गायकवाड ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कदम, बालाजी दुधाटे, कृष्णा बचाटे, तलाठी श्री गोरे, ग्रामसेवक श्री तांदळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. रामराव लांडे यांनी आभार मानले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.