आमदाराकडूनच नियमांची पायमल्ली, विनामास्क मंदिराच्या गाभाऱ्यात खंडेरायाची महापूजा

काँग्रेस आमदारानेच दाखवली शासकीय नियमांना केराची टोपली

0

पुरंदर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नियम आणि अटींसह परवानगी देण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे अखेर आजपासून उघडण्यात आली. पण, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या आमदाराने नियम मोडल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी विनामास्क  मंदिराच्या गाभाऱ्यात  जाऊन पूजा केली आहे.

गेली आठ महिन्यांपासून जास्त काळ जेजुरीचा खंडोबा गड कोरोनाच्या परिस्थितीमुळे बंद होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर मंदिरे भाविकांसाठी देव दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत.  आज पहाटे साडेपाच वाजता काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. देवाची भूपाळी, सनईचे मधुर सूर आणि महाआरतीच्या मंगलमय वातावरणात आज जेजुरीगड जागा झाला. पण, मुख्य गाभाऱ्यात जगताप यांनी सहपत्नी पूजा केली तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. एवढंच नाहीतर पूजा करवून घेताना पुजाऱ्यांनी सुद्धा मास्क घातलेला नव्हता. राज्य सरकारने मंदिरे उघड असताना मंदिरात मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे स्पष्टपणे सांगितले. पण, जगताप आणि मंदिर प्रशासनाकडून नियमांची पायमल्ली केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, देव संस्थानाकडून यासाठी शासकीय नियम व अटी पाळत भाविकांना दर्शनाची सुविधा निर्माण केला आहे. सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनिंगची सुविधा निर्माण केली असून एका वेळी 100 भाविकांना गडकोटात सोडण्यात येणार आहे. मुख्य प्रवेश द्वारातून गडकोटात प्रवेश देण्यात येणार आहे तर दर्शनानंतर माघील पश्चिमेच्या दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. भाविकांना कासाववरून मुख दर्शन दिले जाणार आहे.

तर भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आले असं म्हणत, सरकारने भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले केले. रविवारी सकाळी 9.00 वाजता दगडूशेठ गणपतीची महाआरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असं भाजपने जाहीर केले आहे. एवढंच नाहीतर मुंबईत भाजपचे आमदार राम कदम यांनी वाजत गाजत सिद्धीविनायक मंदिरात जाणार असल्याची घोषणाच केली आहे. दरम्यान, सिद्धीविनायक मंदिर तब्बल 8 महिन्यांनी सुरू झालं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा पहिला मान मुंबईतील घाटकोपर इथल्या अमित नाईक यांना मिळाला आहे. सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी ऑनलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. आज 1 हजारांचे ऑनलाईन बुकिंग झालं आहे. ऑफलाईनसाठी क्यू आर कोड देण्यात आला आहे. दर तासाला 100 असे 10 तास, आज 1000 भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.