मिटकरींचा तुषार भोसलेंवर हल्लाबोल, भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे आंदोलन

काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?

0

मुंबई  :  “साधूसंत सरकार पाडतील, साधूसंत म्हणजे नेमके कोण?, ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची नक्की व्याख्या कोणती?”, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी उपस्थितीत केला आहे. मंदिरे उघडण्यासाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी तुळजापुरात आंदोलन केले आहे. त्या आंदोलनावर टीका करताना अमोल मिटकरींनी भोसलेंवर जोरदार प्रहार केला.

काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?, अशी टीका मिटकरींनी भोसलेंवर केली आहे. जातीय द्वेष पसरवणे ही साधुसंतांची व्याख्या असते का?, वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, येथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असे अमोल मिटकरी म्हणाले. स्वतःला तुम्ही संतसाधू म्हणवून घेता, तुम्हाला हरिपाठ तरी पूर्ण पाठ आहे का?, असे थेट आव्हान मिटकरींनी भोसलेंना दिले आहे. भारतीय जनता पार्टीने काही लोक मुद्दामहून सोडलेली आहेत. ही कुठली आध्यात्मिक आघाडी आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे, त्यापेक्षा जास्त काळजी महाविकास आघाडी सरकारला जनतेची आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता सरकारनं हे नियम लावलेले आहेत. धर्माच्या नावावर वारकरी सांप्रदायाला बदनाम करण्याचे काम हे काही लोक करत आहेत, असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. मी स्वतः वारकरी आहे. ही मूठभर मोजकी लोक यांनी मुद्दामहून सोडलेली आहेत, जेणेकरून जनतेचे लक्ष विचलित करता येईल. महाविकासआघाडीला बदनाम करण्यासाठी अशी टोकाची भाषा वापरली जात असल्याची टीका अमोल मिटकरींनी भाजपावर केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.