राज्यमंत्री सत्तार यांचा व्हिडिओ व्हायरल! कार्यकर्त्याला दिली धमकी 

कार्यकर्त्याला शिवीगाळ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे शिवसेनेची वाढणार डोकेदुखी

0
औरंगाबाद  :  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. पैसे घेऊन पळून जातात साले,  हरामखोर ! तुझ्या घरात घुसून मारीन, अशा धमकीचा अर्वाच्य शिवीगाळ करतानाच हा व्हिडीओ शिवसेनेची डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. पैसे घेऊन पळून जातात साले,  हरामखोर ! तुझ्या घरात घुसून मारीन, अशा धमकीचा अर्वाच्य शिवीगाळ करतानाच हा व्हिडीओ शिवसेनेची डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा  सुरू आहे. कोरोनाच्या काळातही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासनाकडून कोट्यवधींची कामे खेचून आणली. सिल्लोड मतदारसंघात जवळपास १०० हून अधिक गावांमध्ये सध्या उद्घाटनाचे सत्र सुरू आहे. याच कार्यक्रमातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जाते. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथील हा व्हिडिओ असल्याचे समजते. एका कार्यकर्त्याला सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पैसे घेऊन पळून जातात, हरामखोर, लाज वाटत नाही. असे उद्वेगाने सत्तार म्हणताना दिसतात. तुझ्या बापाला माझ्यासमोर आण, चपलाने मारीन,  तुझ्या घरात घुसून तुला मारीन ! अशी धमकीही या व्हिडिओ मंत्री सत्तार देतांना दिसतात. काही कार्यकर्ते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हीडिओत दिसते. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांपैकी एकाने हा व्हिडीओ बनवण्याचे बोलले जाते.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या सारे काही आलबेल नाही. यातच कार्यकर्त्याला शिवीगाळ करणारे अब्दुल सत्तार. यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचे म्हटले जाते. मंत्रीच जर अशाप्रकारे कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून घरात घुसून मारण्याची धमकी देत असतील तर सर्वसामान्यांचे काय ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.