राज्यमंत्री बच्चू कडू यांचे विधान, …तर मी भाजपात प्रवेश करेन!

कृषी विधेयक धोरण देशात लागू , या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचे हे विधान

0

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी आणलेल्या कृषी विधेयक कायद्यात माझ्या दोन अटी मान्य केल्यास मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं मोठे विधान शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. केंद्र सरकारने  काही दिवसांपूर्वी कृषी विधेयक धोरण देशात लागू केले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी हे विधान केले आहे.

या धोरणाअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समिती बाहेर कुठेही शेतमाल विकता येणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्यास केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान या कायद्याला काँग्रेससह आदी पक्षांनी विरोध केला. शिवसेनेने या विधेयकाला पाठींबा दिला होता. मात्र राज्यभेत  सभात्याग केला. दरम्यान या कृषी विधेयकावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना ५० टक्के नफा मिळवून भाव देण्याचे आश्वासन दिले होते. ५० टक्के नफा धरुन हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांत मिळालेला नाही. कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल, शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला ५० टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करणे आणि हमीभावानुसार शेतमाल खरेदी करणे, या दोन वाक्यांच्या समावेश करावा. मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास भाजपमध्ये प्रवेश करू, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.