‘तारळी’ पुलावरून मिनीबस 50 फुट कोसळून भीषण अपघात; पाच जागीच ठार, सहा जण गंभीर

बसमधील जखमी प्रवासी बाहेर आल्यानंतर मिळाली घटनेची माहिती

0

सातारा : दिवाळीची धूम सुरु असताना आशियाई महामार्गावर सातारापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या पुलावरुन मिनीबस सुमारे 50 फुट खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दिवाळीची धूमधाम सुरु असताना आशियाई महामार्गावर सातारापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या पुलावरुन मिनीबस सुमारे 50 फुट खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.मिनीबस वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष एक महिला व तीन वर्षाचा मुलगा असे पाच जण ठार झाले आहेत. उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे 50 फुट खाली कोसळली. बसमधील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात झाल्याचे समजले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य सुरू केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.