मराठा आरक्षण रद्द करा, इम्तियाज जलील यांची न्यायालयात याचिका दाखल

0

मराठा आरक्षण तातडीने रद्द करा, या मागणीची याचिका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

मराठा समाजाला देण्यात आलेले 16 टक्के आरक्षण तातडीने रद्द करावे असे या याचिकेत म्हटले आहे. तसेच मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करावा असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. ‘राज्यातील मुस्लिम आरक्षणाच्या प्रलंबित मुद्दयावर अद्याप कोणताच निर्णय झाला नाही. मुस्लिम समाजाला मुद्दाम डावलले जात आहे.’ असा आरोप करून त्यांनी मुस्लिम वर्गाला तत्काळ आरक्षण मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. मुस्लिम समाजाच आणि यातील काही ठराविक घटकांचे जातीनिहाय सर्वेक्षण करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तत्काळ आरक्षण मंजूर करावे असेही त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.

मराठा आरक्षणामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. मराठा समाजासोबत मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

त्यांनी अॅड. सतिश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे. या याचिकेवर मुख्य याचिकेसह 23 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.